दिनांक : ९.३.२०२६
_*हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम*_
*हरवळे, साखळी येथील ‘गोवा कॉलेज ऑफ फिजियोथेरपी’ येथे विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके वर्ग संपन्न*
पणजी, ९ मार्च – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नुकताच हरवळे, साखळी येथील ‘गोवा कॉलेज ऑफ फिजियोथेरपी’ येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके वर्ग घेण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु . सुरभि छत्रे यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके शिकवताना स्वसंरक्षणाचे महत्त्वही विशद केले.
या वेळी कु. सुरभि छत्रे म्हणाल्या,‘‘आज प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः स्वसंरक्षणासाठी सिद्ध होणे काळाची गरज आहे. आपला इतिहास शौयाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे, महाराणा प्रताप, स्वातंत्र्य काळात लोकमान्य टिळक भगतसिंग आणि त्यापूर्वी राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा हे आपल्या भारताचे वीर आणि रणरागिणी आहेत. राष्ट्राची शक्ती ही त्याची युवा पिढी असते आणि या युवा पिढीने वीर आणि रणरागिणी यांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्याला स्वराज्य मिळाले पण त्याचे सुराज्यामध्ये रूपांतर झाले का? सुराज्य निर्मितीसाठी प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याबरोबर स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.’’ या वेळी उपस्थितांना स्वसंरक्षणाची तंत्र आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके शिकवण्यात आली. यानंतर एक ‘ई-पोस्टर्स’ स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा महाविद्यालयातील १२० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक,*
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)






