जी . एस् . आमोणकर विद्या मंदिर , म्हापसा ‘ या शाळेत पा . शि . संघातर्फे
पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन .
हळदोणा वाताहार . –
म्हापसा येथील न्यू गोवा एज्युकेशन
ट्रस्टचे जी . एस् . आमोणकर
विद्यामंदिर , या शाळेत पा . शि . संघातर्फे पालकांसाठी विविध स्पर्धांचे
आयोजन करण्यात आले होते . पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या
पालकांसाठी टाकाऊतून टिकाऊ ,
फुलांची रांगोळी ‘ मेंदी रेखाटन या
स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या .
त्यात ३५ स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने
भाग घेतला .
या स्पर्धांना परिक्षक म्हणून माजी शिक्षक व पत्रकार
. भारत बेतकेकर व मयुरा देशपांडे
परब हे लाभले होते .
कार्यक्रमाला शाळेच्या उपमुख्याध्यापिका
मा . झेना व्हि एगस् तसेच पू . प्रा .
विभागाच्या प्रमुख मा . अंजली कामत
व पा . शि . संघाचे अध्यक्ष श्री .
महेश कुमार चोडणकर व इतर सभासद ही उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका
ममता सावंत यांनी केले तसेच इतर
शिक्षिकांनीही यात सहभाग घेतला .
शाळेच्या शिक्षिका ‘ सिया मिशाळ
यांनी परिक्षकांची ओळख करून दिली .याप्रसंगी परिक्षक भारत बेतकेकर व मयुरा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच्या हस्ते विजेताना बक्षीस प्रदान करण्यात आली. शिक्षिका अंकिता गोवेकर यांनी आभार प्रदर्शन केले .

फोटो भारत बेतकेकर
विजेता समवेत अंजली कामत, भारत बेतकेकर व इतर






