मणिपाल हॉस्पिटल गोवा तर्फे यशस्वीरित्या केली पश्चिम विभागातील पहिली मेड-इन-इंडिया स्टारबीम-गायडेड कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी
गोवा- मणिपाल हॉस्पिटल गोवा तर्फे यशस्वी रित्या इमेजिंग गायडेड कॉप्म्लेक्स ॲन्जोप्लास्टी पूर्ण करण्यात आली, ही शस्त्रक्रिया एका ७९ वर्षांच्या पुरुष रुग्णावर करण्यात आली. त्या रुग्णाच्या शरीरात जवळजवळ ९५ टक्के कॉरोनरी आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस होते. ही प्रक्रिया प्रथमच स्टारबीम ओसटी इमेजिंग तंत्रज्ञानाने युक्त कॅथलॅबचा वापर करुन करण्यात आली. हे तंत्रज्ञान संपूर्णत: भारतीय इंट्राव्हस्क्युलर कॅथेटर ने युक्त असून संपूर्ण पश्चिम विभागात प्रथमच याचा वापर करण्यात आला आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञाना मुळे डॉक्टारांना रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमधील भागाची अतिशय सखोल माहिती मिळते ज्यामुळे ते रक्तवाहिनीच्या आतील भागाचा नीट अभ्यास करुन उपचार करु शकतात, ज्यामध्ये किती प्रमाणात रक्तवाहिनी मध्ये अडथळा आहे तसेच रक्तवाहिन्यांची जाडी तसेच गाठींची माहिती प्राप्त करु शकतात. या अचूकते मुळे ते योग्य साईझ आणि स्टेंटची जागा प्राप्त होऊन भविष्यात अधिक समस्या होण्यापासून आणि कार्डिॲक धोके कमी होण्यास मदत होते.
ही ॲन्जोप्लास्टी संपूर्णत: भारतीय बनावटीच्या ओसीटी आणि आयव्हीयूएस ड्यूअल इमेजिंग इंट्राकॉरोनरी कॅथेटर सिस्टमचा वापर करुन करण्या आली असून याची निर्मिती मेरील ने स्टारबीम प्लॅटफॉर्म वर करण्यात आली आहे. यामुळे हॉस्पिटल आणि कार्डिओलॉजी विभागाने एक प्रगतीचा नवीन टप्पा पार केला आहे.
यावेळी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी डॉ. निखिल सोनटक्के यांनी सांगितले “ अशा प्रकारच्या जटील केसेस मध्ये रक्तवाहिनीच्या आतल्या गोष्टी दिसणे खूपच महत्त्वाचे असते. या स्टारबीम तंत्रज्ञानामुळे त्या भागाची जटीलता कळेत आणि किती प्रमाणात ब्लॉकेजेस आहेत याची माहिती मिळते, ज्यामुळे स्टेंट अचूकपणे ठेवता येऊन अधिक सुरक्षित उपचार करता येतात. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या नाविन्यपूर्ण अशा उपचार पध्दतीमुळे आम्ही हे करु शकलो याचा आंम्हाला अभिमान वाटतो.”
मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ या यशामुळे आमच्या अत्याधुनिक अणि स्थानिक अशा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर या भागातील रुग्णांसाठी उपलब्ध करण्याची आमची वचबध्दता अधोरेखित होते. पश्चिम विभागातील अशा प्रकारची ही पहिली यशस्वी प्रक्रिया असून ही आमच्या कार्डिओलॉजी टीमसाठी अभिमानाची गोष्ट असून यामुळे काडिॲक क्षेत्रात उच्च गुणवत्तेवर लक्ष देण्याचे आमचे लक्ष्य पुर्नस्थापित होत आहे.”
या यशस्वी प्रक्रियेमुळे आमच्या कार्डिओलॉजी विभागाच्या मुकूटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून यामुळे सातत्यपूर्ण नाविन्य आणि सर्वोत्कृष्ट हार्ट केअर उपलब्ध करुन देण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यात आले आहे.
|
|
मणिपाल हॉस्पिटल गोवा तर्फे यशस्वीरित्या केली पश्चिम विभागातील पहिली मेड-इन-इंडिया स्टारबीम-गायडेड कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी
Advertisement






