थिवि वाताहार
जायट् ग्रुप ऑफ पर्वरी व जायट् ग्रुप ऑफ सहेलीचा संचालक मंडळ अधिकार ग्रहण सोहळा पर्वरी येथील शुभलक्ष्मी मिनी सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते या वेळी व्यासपीठावर संदीप नाडकर्णी ,फेडरेशन १० अध्यक्ष केशव देशपांडे, दीपक डिसोझा, सेन्ट्रल कमिटी मेंबर वर्षो नाईक, संजय बाणावलीकर ,जायट् ग्रुप ऑफ पर्वरी अध्यक्ष राजन तानकर ( चोडणकर) आदी उपस्थित होते यावेळी नुतन संचालक मंडळाला शपथ देण्यात आली. पर्वरी जायट् ग्रुप अध्यक्ष राजन चोडणकर उपाध्यक्ष रामदास नाईक, दिनेश कुबल ,रवी नाईक ,महाबळेश्वर देसाई संचालक मंडळ दत्ताराम मांद्रेकर, नकुल म्हामल, विश्वनाथ हळदणकर , सी. नारायणन, शंकर चोडणकर,सहेली पर्वरी अध्यक्ष कल्पना मोरजकर, संचालक मंडळ प्रज्ञा पेडणेकर सुमित्रा नाईक सरीता पै आंगले,स्नेहा वळवईकर सुहासिनी नारायण ,विजयालक्ष्मी बोरकर ,वंसूधरा देसाई या संचालक मंडळाला शपथ देणात आली कार्यक्रम सूत्रसंचालन नकुल म्हामल यांनी केले तर स्मिता म्हामल यांनी आभार मानले

जायट् ग्रुप ऑफ पर्वरी, जायट् ग्रुप ऑफ पर्वरी सहेली अधिकार ग्रहण प्रसंगी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, नुतन अध्यक्ष राजन चोडणकर, संदीप नाडकर्णी, केशव देशपांडे व इतर






