पणजी येथील गोवा पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेचे अमूल्य ग्रंथ प्रदर्शन

पणजी येथील गोवा पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेचे अमूल्य ग्रंथ प्रदर्शन
 पणजी, २ फेब्रुवारी – आध्यात्मिक साधना, धर्मशिक्षण, संस्कारयुक्त हिंदु जीवनमूल्ये आणि सनातन धर्माविषयी शास्त्रीय मार्गदर्शन करणारे सनातन संस्थेचे अमूल्य ग्रंथ आता बांदोडकर मैदान, पणजी येथे पणजी येथे ४ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या ‘गोवा बुक फेस्टिव्हल’मध्ये उपलब्ध असणार आहे. सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन प्रतिदिन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.
     सनातन संस्थेच्या या प्रदर्शनात साधनेत प्रगती करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीगणेश, देवी, इत्यादी देवताविषयक शास्त्रीय माहिती, कुटुंबातील कलह निवारण, संस्कारक्षम बालसंस्कार आणि धर्मशिक्षण यांसारख्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. ‘जीवन कसे जगावे ?’, ‘साधना कशी करावी ?’, ‘तणावमुक्ति आणि आनंदी जीवनाचे रहस्य काय ?’ अशा प्रश्नांची सुबोध, विज्ञानाधिष्ठित आणि आचरणात आणता येईल अशी उत्तरे या ग्रंथांमधून मिळणार आहेत. सनातन संस्थेच्या ग्रंथप्रर्दानाला भेट देण्याचे आवाहन समाजातील अनेक मान्यवरांनीही जिज्ञासूंना केले आहे. याविषयी धेंपो वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य (डॉ.) मनोज कामत म्हणाले,‘‘मनुष्याने स्वभावदोष निर्मूलन कसे करावे, भारतीय सण शास्त्रीयदृष्ट्या कसे साजरे करावे आदींवर विषयांवरील सनातनच्या ग्रंथांचा जिज्ञासूंनी लाभ घेतला पाहिजे.’’ गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य ह.भ.प. सुहास वझे म्हणाले,‘‘प्रत्येक जिज्ञासूने नामाचे महत्त्व सांगणारा, तसेच सनातन संस्थेचे अन्य ग्रंथ आवजूर्न घ्यावेत.’’ मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक श्री. गो.रा.ढवळीकर म्हणाले,‘‘मुलांनी अभ्यासात एकाग्रता कशी साध्य करावी? दैनंदिन जीवनात आचारधर्माचे पालन कसे करावे याविषयींचे सनातन संस्थेचे ग्रंथ सर्वांनी अवश्य घ्यावेत.’’ गोवा बुक फेस्टिव्हलला भेट देणार्‍या सर्वांनी सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास अवश्य भेट देऊन आपल्या आणि परिवाराच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त असे ग्रंथ घरी घेऊन जावेत, असे आवाहन सनातन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
आपला नम्र
श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन भारतीय संस्कृती संस्थेकरिता,
(संपर्क : ९३७०९५८१३२)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें