*संविधान गौरव रॅली*
आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. यामुळे आपला देश संविधानावर चालत आहे. कारण आपल्या देशाची व्यवस्था संविधानाने निश्चित केलेली आहे. सर्व नागरिकांना समान हक्क, अधिकार दिलेले आहेत. संविधान सर्व नागरिकांना सन्मानाने स्वाभिमानाने जगण्याची हमी देते असे प्रतिपादन ऑल गोवा डेमो्क्रॅटिक फेडेरेशनचे अध्यक्ष श्री सुभाष केरकर यांनी केले. ते भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती गोवातर्फे आयोजित संविधान गौरव रॅली कार्यक्रमात बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पाटो पणजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहर अर्पण केल्यावर रॅलीला सुरवात झाली आणि आझाद मैदानावर तिचे सभेत रूपांतर झाले.
जगातील पुढारलेल्या अमेरिका, फ्रांस, जर्मनी सारख्या देशातील महिलांना मतदानाचा अधिकार संघर्ष करून मिळवावा लागला. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना सर्व हक्क सोयी सुविधा न मागता ना संघर्ष करता मिळवून दिल्या याची जाण सर्व महिलांनी ठेवायला हवी असेही श्री केरकर म्हणाले.
श्री केरकर पुढे बोलताना म्हणाले कीं, सध्य स्थितीत आपल्या देशात संविधाना विरोधात काही राष्ट्रद्रोही शक्ती अपप्रचार करत सुटल्या आहेत. अशाने ह्या राष्ट्रद्रोही शक्ती संविधानाचे पावित्र्य भंग करत आहेत यावर सरकारने कठोर उपाय योजना करायला हवी.
भारतीय बौद्ध महासभा गोवा राज्य अध्यक्ष श्री एस के जाधव भारतीय संविधान काही सामान्य पुस्तकं नसून आपल्या देशाचे भवितव्य निर्धारित करणारा दस्तऐवज आहे. तो कुणी लुंग्या सुंग्याने निर्माण केलेला नाही. तर हे संविधान निर्मितीमध्ये प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेबांनी आपली बुद्धी विद्वत्ता पणाला लावली आहे तेव्हाच हे जगमान्या सर्वोत्तम संविधान निर्माण झालेले आहे हे आम्ही विसरता कामा नये. संविधानाचा सन्मान हाच देशाचा सन्मान आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिन आणि संविधानाचे महत्व कथनकरताना विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती गोवाचे विद्यमान अध्यक्ष श्री सतीश कोरगावकर म्हणाले कीं आम्ही भारतीय २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतो कारण हा आपल्या संविधानाचा सोहळा आहे. या दिवशी आपल्या संविधानाने आपल्या भारत देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले, येथील प्रत्येक नागरिकांला न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.तसेच कायद्या पुढे सर्वजण समान असल्याची ग्वाही देते. सर्व नागरिकांची सुरक्षा, कल्याण, विकासाची हमी दुसऱ्या अर्थाने आपले संविधान प्रत्येक नागरिकांला सामाजिक, आर्थिक, समान न्याय देते. अशा आपल्या जगमान्य, गौरवलेले आपले संविधान त्याचे आम्हा प्रत्येक नागरिकाला ज्ञान, भान, आणि जाण असणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर संविधानाचे पावित्र्य राखणे हे आपण सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे
सावित्रीबाई महिलांमंडळ गोवाच्या संस्थापक अध्यक्षा सौं. छाया कोरगावकर आपल्या भाषणात म्हणाल्या कीं, भारतीय संविधान केवळ देश चालविण्याच
आचारसंहिता नाही. तर तो देशाचा आत्म आहे. संविधानामुळे आपला देश मजबूत आहे. संविधान या देशात राहणाऱ्या सर्व भारतीयांचे हक्क ठरवते. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचे राजकारण, कार्यपद्धती, सत्ता, अधिकार आणि कर्तव्ये यांच्या रचना आणि आचारसंहितेमध्ये दिसून येते.
सावधानतेचा इशारा देताना सौं. कोरगावकर म्हणाल्या कीं भारतीय गणराज्य दिन हा आपल्या संविधानाचा गौरव सोहळा आहे. ह्या सोहळ्यांत सहभागी होणे, त्याच्या रक्षणार्थ जागृत असणे आपले कर्तव्य आहे. संविधान द्रोह हा राष्ट्रद्रोह आहे सर्वांनी ध्यानात ठेवावे.
यावेळी सावित्रीबाई फुले महिलांमंडळ गोवाच्या अध्यक्षा सौं वासंती परवार, डॉ बाबासाहेब आंबेडकर जनसेवा समिती पेडणेचे अध्यक्ष श्री अर्जुन जाधव, समितीचे कार्यकारी सदस्य श्री अमर फरास
अडवालपाल ग्रामपंचायतीचे पंच श्री शेखर परवार, कोरगाव देऊळवाडा पेडणे ग्रामपंचायतीचे पंच श्री दिवाकर जाधव, सावित्रीबाई फुले महिलांमंडळ गोवाच्या माजी अध्यक्षा सौं प्रमिला प्रजाक्ते, सहित्यिक श्री नारायण खोरजुवेकर श्री
राया परवार, श्री प्रकाश परवार यांनीही आपले विचार मांडले. रॅलीच्या आयोजनात कांता जाधव,
निखिल प्राजक्ते,, शिवानंद गवाणेकर, कु. आशा गवाणेकर,चंद्रकांत कोरगावकर, प्रकाश पवार, श्याम म्हापसेकर आदिनी विशेष प्रयत्न केले.






