कासारवर्णे, पेडणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’*_

_

दिनांक : २७.१.२०२६

_*कासारवर्णे, पेडणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’*_

*भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून संघटित होणे अनिवार्य! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ*
पेडणे, २७ जानेवारी – वर्तमान काळात हिंदूंसमोर अनेक संकटे उभी आहेत. या संकटांचा सामना करण्यासाठी आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण आणि संघटित होणे हे अनिवार्य आहे, असे आवाहन गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने परबवाडा, कासारवर्णे, पेडणे येथील श्री राम मंदिर सभागृहात आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. जयेश थळी बोलत होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर यांची उपस्थिती होती.


श्री. जयेश थळी पुढे म्हणाले,‘‘आमची मंदिरे केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित न राहता, ती हिंदूंना धर्मशिक्षण देणारी आणि संघटनशक्तीची केंद्रे बनली पाहिजेत. तसेच मंदिरांचे पावित्र्य राखणे आणि त्यांची सुरक्षा करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हिंदूंनी ‘लँड जिहाद’चे षडयंत्र हाणून पाडण्याच्या संघटित आणि सतर्क रहाणे आवश्यक आहे.’’ श्री. युवराज गावकर म्हणाले,‘‘आज ‘लव्ह जिहाद’ गोव्यात फोवावू लागला आहे. हिंदू मुलींना हेतूपुरस्सर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करून पुढे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. हे रोखण्यासाठी आपल्या मुलींना ‘धर्मशिक्षण’ देणे ही काळाची गरज आहे. तसेच गोव्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा होणे काळाची गरज आहे. हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या माध्यमातून माताभगिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या रक्षणासाठी सज्ज होणे ही काळाची गरज आहे.’’ सभेचे सूत्रसंचालन सौ. सोनम शिरोडकर यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. अंकुश परब यांनी केले.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें