अरबीएनबी इनसाइट्समधून संगीतावर आधारित अनुभव जनरेशन झीच्या प्रवासाला आकार देत असल्याचे स्पष्ट*

*अरबीएनबी इनसाइट्समधून संगीतावर आधारित अनुभव जनरेशन झीच्या प्रवासाला आकार देत असल्याचे स्पष्ट*

*गोवा, ६ जानेवारी २०२६ :* एअरबीएनबीच्या एक्स्पिरियन्स-लेड ट्रॅव्हल इनसाइट्सनुसार, भारतातील जनरेशन झी (१८–२८ वयोगट) प्रवासासाठी संगीत मैफिली आणि महोत्सवांना अधिक प्राधान्य देत आहेत. २०२६ मध्ये ६२ टक्के जेन झी संगीत मैफिली आणि महोत्सवांसाठी प्रवास करण्याचा विचार करत असून, ७६ टक्क्यांनी अशा कार्यक्रमांमुळे प्रथमच एखाद्या शहराला भेट दिली आहे.

संगीतावर आधारित प्रवासाचा परिणाम कार्यक्रमस्थळांपुरता मर्यादित नसून, ६५ टक्के तरुण कार्यक्रमांच्या ठिकाणांजवळ राहणे पसंत करतात. त्यातील ५३ टक्के प्रवासी मुक्काम वाढवून स्थानिक कॅफे, नाईटलाइफ, सांस्कृतिक स्थळे आणि परिसरांचा अनुभव घेतात. हा प्रवास प्रामुख्याने गटांमध्ये होत असून ७० टक्के लोक मित्रांसह किंवा समूहांसह कॉन्सर्टला उपस्थित राहतात.

या अनुभवांचे महत्त्व त्यांच्या खर्चाच्या पद्धतीतूनही दिसून येते. दहापैकी सहा तरुण आपल्या मासिक उत्पन्नाच्या २१–४० टक्के रक्कम संगीतकेंद्री प्रवासासाठी खर्च करण्यास तयार असून, सरासरी खर्च ₹५१,००० इतका आहे. ४० टक्क्यांहून अधिक तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावरही संगीत कार्यक्रमांसाठी प्रवास करण्यास उत्सुक आहेत.

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियासाठीचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “संगीत मैफिली आणि महोत्सवांमध्ये वाढत्या स्वारस्यामुळे एका नवीन प्रकारच्या प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला आहे – जो संगीताला नवीन स्थळे शोधण्याचे प्रवेशद्वार म्हणून पाहतो. पर्यटनाचा हा नवीन प्रकार प्रवाशांच्या वर्तनाला आकार देत आहे. त्यामुळे समूहांना एकत्र वेळ घालवता येतो. ते सहजपणे एकत्र येतात आणि संस्मरणीय अनुभव निर्माण होतात. ते एअरबीएनबीकडून देण्यात येत असलेल्या अनुभवांशी पूर्णपणे सुसंगत आहेत.”

लोलापालूझा इंडियासारखे मोठ्या स्वरूपाचे महोत्सव या बदलाचे प्रतीक असून, ९८ टक्के उपस्थितांनी पुन्हा येण्याचा इरादा व्यक्त केला आहे. या गतीला पुढे नेत, एअरबीएनबीने आपल्या पहिल्या जागतिक लाईव्ह म्युझिक भागीदारीअंतर्गत लोलापालूझा इंडियाशी भागीदारी केली असून, २४–२५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या महोत्सवात विशेष अनुभव देण्यात येणार आहेत.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें