साखळी येथील ‘रणरागिणी’ च्या हिंदु महिला संघटन मेळाव्यात मागणी
विधानसभेत लव्ह जिहाद’ विरोधी कायदा पारित करा !
साखळी, ४ जानेवारी – गोवा विधानसभेच्या १२ जानेवारी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा पारित करावा, अशी एकमुखी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेने ४ जानेवारी या दिवशी सायंकाळी साखळी नगरपालिका सभागृह येथे आयोजित हिंदु महिला संघटन मेळाव्याद्वारे करण्यात आली. या मेळाव्याला साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. सिद्धी प्रभू, अधिवक्ता सौ. स्वाती केरकर, रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य सहसमन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना अधिवक्ता सौ. स्वाती केरकर म्हणल्या,”लव्ह जिहाद हे सुनियोजित षडयंत्र आहे .लव्ह जिहाद घातक आहे आणि या विरोधात घरोघर प्रसार झाला पाहिजे. कायदा हे अस्त्र आहे त्याचा वापर आपण लव्ह जिहाद विरोधात केला पाहिजे. मकर संक्रांतीला आपण वाण म्हणून सनातन संस्थेतर्फे प्रकाशित लव्ह जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतरविरोध आदी ग्रंथ देऊन याविषयी समाजात जागृती केली पाहिजे.” साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष सौ सिद्धी प्रभू म्हणाल्या,”आपण आपल्या पाल्यांना बाल्यावस्थेत सुसंस्कारित करणे आवश्यक आहे. मुलाकडे संवाद साधला पाहिजे व मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. मुलांचे वागणे व बोलणे यावर लक्ष ठेवले पाहिजे.” रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात लव्ह जहाज या षड्यंत्राविषयी माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य सहसमन्वयक श्री. गोविंद चोडणकर म्हणाले,”आपला ज्वलंत इतिहास आपण आठवला पाहिजे. आज आपण माता जिजाऊ, राणी पद्मिनी आदींचा आदर्श ठेवणे ही काळाची आवश्यकता आहे. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा व्हावा यासाठी स्थानिक आमदारांना भेटून आपण त्यांच्याकडे तशी मागणी केली पाहिजे.” मेळाव्यात साखळी पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ. रश्मी देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्या सौ. शुभदा सावईकर, हरवळे पंचायतीच्या सरपंच सौ. प्रतीक्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होत्या. मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेला लव्ह जिहाद ग्रंथाचे मोठ्या संख्येने वितरण झाले.
आपली नम्र,
सौ. राजश्री गडेकर,
रणरागिणी शाखा
(संपर्क क्रमांक : ७७७४८ ५१२५३)
साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. सिद्धी प्रभू,
‘रणरागिणी’च्या हिंदु महिला संघटन मेळाव्यात उपस्थित महिला वर्ग.






