गोव्याचा अंडर १९ महिला संघ जाहीर
पणजी
गोवा क्रिकेट असोसिएशनने महिलांच्या १९ वर्षाखालील वनडे ट्रॉफी २०२५–२६ स्पर्धेसाठी गोवा संघ जाहीर केला आहे. ही स्पर्धा १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बडोदा येथे पार पडणार आहे.
हर्षिता यादव हिची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संचिता सैल ही उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.
महिला अंडर-१९ वनडे ट्रॉफीसाठी निवडलेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे:
१. हर्षिता यादव (कर्णधार)
२. सचिता सैल (उपकर्णधार)
३. एंजेल डी’कॉस्ता
४. उस्मा खान
५. अथश्री शिवरकर
६. विधी भांडारे
७. प्राची निकम
८. प्रीती गांवकर
९. निखिला नाईक
१०. रक्षंदा कळंगुटकर
११. निधी गोवेकर
१२. आर्या आजगावकर
१३. जोया मीर (यष्टिरक्षक)
१४. नंदिनी चव्हाण
१५. श्वेता हुबळी
१६. शिल्पा शर्मा (यष्टिरक्षक)
१७. विपर्णा गारुडी
गोवा संघ लीग फेरीत महाराष्ट्र (१३ डिसें.), उत्तर प्रदेश (१५ डिसें.), पुदुच्चेरी (१७ डिसें.), तमिळनाडू (१९ डिसें.) आणि उत्तराखंड (२१ डिसें.) यांच्याविरुद्ध बडोदा येथे खेळणार आहे.






