दिल्लीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन !*_ *गोव्यातून विविध क्षेत्रांतील सुमारे ५० जण उपस्थित रहाणार

 

दिनांक : ९.१२.२०२५

_*दिल्लीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन !*_

*गोव्यातून विविध क्षेत्रांतील सुमारे ५० जण उपस्थित रहाणार*

*महोत्सवात संत-महंत, मंत्री यांच्यासह हजारो साधक उपस्थित रहाणार*

पणजी, ९ डिसेंबर – देशात सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचे जागरण होण्यासाठी भारताने विश्वकल्याणकारी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उभे राहणे अत्यावश्यक आहे. हाच संदेश देशभर पोहोचवण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ १३ व १४ डिसेंबर २०२५ या दिवशी नवी दिल्ली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्’मध्ये होणार असल्याची माहिती स्वागत समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी दिली. गोव्यातून या महोत्सवासाठी ‘भारत स्वाभिमान’, ‘हिंदू युवा शक्ती’, ‘गोमंतक मंदिर महासंघ’, ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ या संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि पदाधिकारी, तसेच उद्योजक मिळून सुमारे ५० जण उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज, केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ, दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष व भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, तसेच सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या महोत्सवाची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. गोव्यातून सर्वश्री कमलेश बांदेकर, सुजन नाईक, जयंत मिरिंगकर, जयेश थळी, राघव शेट्टी, अधिवक्ता सुनील शिरसाट, अधिवक्ता आनंद पालकर आदी सहभागी होणार आहेत.
दोन दिवसीय महोत्सवात ‘सनातन संस्कृती संवाद’, सांस्कृतिक-सामाजिक घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद-नक्षलवादाची पार्श्वभूमी, संरक्षणनीती आणि ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उद्बोधन करतील. भारत मंडपम्मधील एक्झिबिशन हॉल क्रमांक ‘१२’ मध्येही १३ ते १५ डिसेंबर २०२५ या तीन दिवसीय कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन’, तसेच ‘सनातन संस्कृती’, ‘राष्ट्र, कला, आध्यात्मिक वस्तू’ यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

आपला नम्र,
श्री. तुळशीदास गांजेकर,
सनातन संस्था,
(संपर्क : ९३७०९ ५८१३२)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें