टीव्हीएस मोटोसोल ५.० चा थरार अनुभवा – मोटरसायकलिंग संस्कृतीचं गोव्यातलं सर्वात मोठं सेलिब्रेशन
टीव्हीएस मोटोसोल ५.० चा थरार परत गोव्यात परत अनुभवता येणार असून रेसिंगचा थरार, कस्टम कल्चरची मजा आणि जागतिक दर्जाचं संगीत यांचा अनोखा मेळ त्यात पाहायला मिळेल. यावर्षीच्या फेस्टिवलमधे बादशहा यांचा भव्य लाइव्ह परफॉर्मन्स तसेच डीजे अकबर, न्युक्लेयास लगोरी यांचे जबरदस्त सेट्स हिलटॉपवर गोव्यातील सर्वात मोठ्या मोटरसायकलिंग कार्यक्रमाची पर्वणी देईल.
जबरदस्त अक्शन असलेल्या डर्ट आणि फ्लॅट ट्रॅक सेशन्सपासून प्रो स्टंट शोकेस, कस्टम बिल्ड डिस्प्लेज, क्रिएटर वर्कशॉप्स, आर्ट झोन्स, मिक्सॉलॉजी काउंटर्स आणि अनोख्या बायकिंगपर्यंत बरंच काही यावेळी अनुभवता येणार आहे. मोटोसोल ५.० मधे उत्साह, संस्कृती, कम्युनिटी गोव्याच्या स्टाइलमधे अनुभवत एक अविस्मरणीय वीकेंड साजरा करता येईल.
स्थळ: हिलटॉप, व्हेगाटॉर, गोवा.
तारीख: ५ आणि ६ डिसेंबर २०२५
वेळ: दुपारी १ नंतर






