केरी पेडणे येथे १६ रोजी अ. भा. गां. महाविद्यालय परीक्षा

केरी पेडणे येथे १६ रोजी
अ. भा. गां. महाविद्यालय परीक्षा

हरमल दि वाताहार
केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्राची (परीक्षा केंद्र क्र.९९७)परीक्षा रविवार १६ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतली जाईल.

प्रवेशिका ते विशारद पदवीपर्यंतच्या या परीक्षा असून ही परीक्षा न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये घेण्यात पूर्ण दिवसभर चालणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचे हाँल तिकिट व आसन क्रमांक अ.भा.गां. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आपला पी. एन. आर. क्रमांक व केंद्र क्रमांक ९९७ टाकून डाउनलोड करून घ्यावे. तसेच ते परीक्षा स्थळी सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी केंद्र व्यवस्थापक आनंद शिरगांवकर, मो. क्र ९५७९२६४७४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें