हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक
दिनांक. : ६.११.२०२५
देशद्रोही पाकप्रेमींना शोधून कारवाई करा; ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे तपास द्या ! – हिंदु जनजागृती समिती
पणजी ,६ नोव्हेंबर – गोव्यात दोन ठिकाणी डिजिटल बोर्डवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहिलेले आढळले. गोव्यात असे होणे ही अतिशय गंभीर असून या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दात निषेध करत आहे. हे डिजिटल बोर्ड लावणार्यांवर ‘एन्.एस्.ए.’ अंतर्गत गुन्हा नोंदवावा आणि या घटनेचा तपास ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे सोपवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केली आहे.

श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘दोन वर्षापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामना चालू असताना कळंगुट येथे एका ‘रेस्टॉरंट’च्या मालकाने आपण पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचे म्हटले होते. एका ‘ब्लॉगर’ने ही बाब उघडकीस आणली होती. म्हापसा येथे हल्लीच बांगलादेशातून आलेल्या गुन्हेगारांनी सशस्त्र दरोडा घातला होता. भारतभर धर्मांतरण करणारा छांगुर बाबा याच्या टोळीतील आयेशा नावाच्या महिलेला गोव्यात पकडण्यात आले होते. या घटना गोवा राज्य आता देशद्रोह्यांना सुरक्षित आश्रयाचे स्थान झाल्याचे द्योतक आहे.’’






